बातम्या
मा. श्री. संजय कुमार वर्मा, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, यांनी वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे प्रस्तावित पोलीस ठाणे इमारत बांधकाम प्रकल्पाच्या जागेस भेट दिली. सदर प्रकल्पांतर्गत पोलीस ठाण्याची नवीन इमारत, फर्निचर तसेच सर्व आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी प्रस्तावित आहे. यावेळी प्रस्तावित जागेची पाहणी करून प्रकल्पाच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.