आमच्याविषयी

आमच्याविषयी

शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक- सीआरपी ०१७४/रोमन पंधरा, दिनांक १४/०२/१९७४ अन्वये महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई या महामंडळाच्या स्थापनेस शासन मंजूरी प्राप्त होऊन दिनांक १३.०३.१९७४ रोजी त्याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नोंदणी क्रमांक १७२८१/१९७३-७४ द्वारे या महामंडळाची नोंदणी करण्यात आली आहे.

या महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु.१०.०० कोटी इतके असून अदा केलेले भागभांडवल रु. ७.९६ कोटी इतके आहे.

या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभाग, कारागृह विभागासाठी प्रशासकीय इमारती / निवासस्थाने बांधणे आणि गृहविभागाच्या घटक आणि संलग्न कार्यालयांसाठी कल्याणकारी योजना तयार करणे व त्या अंमलात आणणे असे आहे. त्याचबरोबर गृह विभागाच्या अधिपत्याखालील अन्य विभागांसाठी सुध्दा बांधकाम प्रकल्पांची कामे करण्यात येतात.