महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभाग, कारागृह विभाग तसेच, गृहरक्षक दल व नागरी संरक्षण विभाग यांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार सर्व सोयी-सुविधांसह अत्याधुनिक इमारतींचा व त्या सभोवतालच्या परिसराचा परिपूर्ण आराखडा तयार करुन बांधकाम करणे.
प्रत्येक विभागाच्या बांधकामाच्या गरजा विचारात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन व सर्वोच्च गुणवत्तेसह आवश्यकते नवीन बांधकाम प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण करणे व त्याचे संबंधित विभागास हस्तांतर करणे.
बांधकाम व्यवसायातील नवनवीन तंत्र व तंत्रज्ञान संबंधित विभागाच्या बदललेल्या गरजा, नव्याने उपलब्ध झालेली साधन सामुग्री या सर्वाचा वापर करुन संपूर्ण पारदर्शकतेसह प्रकल्प बांधकाम करणे.
दृष्टी:
या महामंडळाकडून तयार करण्यात येणारे प्रशासकीय इमारती तसेच, निवासी बांधकामे मुख्यत: कायद़याचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात येतात. त्यामुळे, पोलीसांची कर्तव्ये, जबाबदा-या, जनतेप्रती असलेली संवेदनशिलता, त्यांच्यावर असलेले ताणतणाव इ. सर्व बाबींचा विचार करुन पोलीस विभागाच्या वेगवेगळया प्रशासकीय इमारतींचे बांधकाम करताना अत्याधुनिक सुविधांसह तेथील अधिकरी/कर्मचा-यांची वेगवेगळी कर्तव्ये विचारात घेऊन प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणी व पोलीस विभागाच्या अन्य इमारती तसेच निवासी बांधकाम प्रकल्प पूर्ण करणे. तसेच, प्रकल्पपूर्ततेनंतर त्याची देखभाल किफायतशीर असेल.