व्यवस्थापकीय संचालक यांचा संदेश
श्रीमती. अर्चना त्यागी, भा. पो. से.
व्यवस्थापकीय संचालक
व्यवस्थापकीय संचालक यांचा संदेश
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे (MSPHC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून आपल्याशी संवाद साधताना मला अत्यंत अभिमान व समाधान वाटते. स्थापना झाल्यापासून, महामंडळ हे महाराष्ट्र पोलिस दलाच्या कल्याण व कार्यक्षमतेसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे.
आमचे ध्येय सुरक्षित, शाश्वत आणि नियोजित निवासी व कार्यालयीन प्रकल्प उभारणे हे आहे, जे सध्याच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील गरजांचाही विचार करतात. अशा प्रकारे, आम्ही राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेस बळकटी देण्यास व कर्तव्यनिष्ठेने सेवा करणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देत आहोत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. महामंडळाची कामे संपूर्ण राज्यभरात सुरू आहेत. मला आनंदाने नमूद करावेसे वाटते की महामंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३८,१७९ निवासस्थाने हस्तांतरित केली आहेत.
पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करणे या गोष्टींवर भर देत महामंडळ नेहमीच नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती, प्रगत तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास तत्त्वे यांचा स्वीकार करत आहे. तसेच, अंतर्गत प्रक्रिया, प्रकल्प देखरेख इत्यादींमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही डिजिटल परिवर्तनही करत आहोत. याशिवाय सध्या प्रशासकीय इमारती, निवासी इमारती , कारागृह , न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, इत्यादी प्रकल्प सुरू झाले असून पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. ही वाटचाल अशीच सुरू राहील.
आपण एकत्र येऊन महाराष्ट्र पोलीस दल व त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी, विश्वासार्ह आणि भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याचे कार्य पुढे चालू ठेवूया. आम्ही आमच्या वापरकर्त्यांसोबत सतत संवाद साधत राहू, समाजासाठी मूल्यनिर्मिती करत राहू आणि नवीन उपक्रमांना चालना देत राहू. आम्ही आमच्या प्रत्येक कृतीत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यास कटिबद्ध राहू.
मला आत्मविश्वास आहे, की यापुढेही महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ हे सर्वांगीण उत्कृष्टतेकडे वाटचाल करत राहील.